प्राचीन, आधुनिकतेच्या संगमातून राष्ट्राची प्रगती - पी. एस. श्रीधरन पिल्लई

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 12 फेब्रुवारी 2020

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव’ व ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कारां’चे वितरण पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले. बावधन येथील ‘सूर्यदत्ता’च्या कॅम्पसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यास अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया उपस्थित होत्या.

पुणे - ‘आपल्या देशाला प्राचीन संस्कृती, परंपरा लाभली आहे. प्राचीन आणि आधुनिकतेच्या संगमातूनच राष्ट्राची प्रगती शक्‍य आहे,’’ असे प्रतिपादन मिझोरामचे राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी केले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सूर्यदत्ता एज्युकेशन फाउंडेशनच्या वर्धापन दिनानिमित्त ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव’ व ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय पुरस्कारां’चे वितरण पिल्लई यांच्या हस्ते करण्यात आले. बावधन येथील ‘सूर्यदत्ता’च्या कॅम्पसमध्ये झालेल्या पुरस्कार सोहळ्यास अहिंसा विश्वभारतीचे संस्थापक आचार्य डॉ. लोकेश मुनीजी, विद्यापीठ अनुदान आयोगाचे उपाध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, दलित इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजचे (डिक्की) अध्यक्ष मिलिंद कांबळे, ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद, सूर्यदत्ता ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूटचे संस्थापक-अध्यक्ष डॉ. संजय चोरडिया, उपाध्यक्षा सुषमा चोरडिया उपस्थित होत्या. 

डॉ. दत्तात्रेय शेकटकर (राष्ट्रसेवा), डॉ. विकास आमटे (समाजसेवा), द्वारका जालान (साहित्य), टोनिंनो लॅम्बोर्गिनी (उद्योजकता), सुधा मल्होत्रा (पार्श्वगायन), डॉ. मकरंद जावडेकर (कॉर्पोरेट), डॉ. कमल टावरी (खादी), मनोरंजन ब्यापारी (साहित्य), फरीद शेख (छायाचित्रण), डॉ. रेणू राज (कायदा) यांना ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय जीवनगौरव’ पुरस्कार प्रदान केला. सोमा घोष (शास्त्रीय संगीत), डॉ. अर्णब भट्टाचार्य (संशोधन), राजेश बत्रा (लोकसेवा), विमल बाफना (सीएसआर), महेश नामपूरकर (स्थापत्यशास्त्र), नमिता कोहक (शौर्य), गोपिका वर्मा (नृत्यकला-मोहिनीअट्टम) यांना ‘सूर्यदत्ता राष्ट्रीय’ पुरस्काराने गौरविले. तसेच, डॉ. विष्णू महाराज पारनेरकर यांना ‘सूर्यरत्न आधुनिक युगाचे संत पुरस्कार’ देऊन सन्मानित केले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The nations progress through the confluence of ancient modernity