पर्यावरणपुरक रंग खेळा.. कृत्रिम रासायनिक रंग टाळा..रंगपंचमीसाठी घरच्या घरी बनवा रंग
कृत्रिम रासायनिक रंग टाळा; घरच्या घरी बनवा रंग
सकाळ वृत्तसेवा
कुर्डुवाडी, ता. ७ : रंगपंचमी सणात रासायनिक रंग खेळल्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आपण घरच्या घरी तयार केलेल्या नैसर्गिक रंगांचा वापर करू शकतो.
रंगपंचमीला विशेषतः लहान मुलांचा उत्साह शिगेला पोचला असतो. रंगपंचमीच्या दिवसाची सुरुवात रंग खेळण्यापासून होते व दिवसाचा शेवटही रंग खेळताना होतो. परंतु कोणत्या प्रकारचे रंग खेळतो याकडे मात्र गांभीर्याने पाहिले जात नाही. बऱ्याच वेळा तयार कृत्रिम रासायनिक रंग खेळले जातात. कृत्रिम रंग खेळल्यामुळे अनेक वेळा इजा किंवा आजार होण्याच्या घटना घडल्या आहेत.
रंग खेळताना इतरांच्या अंगावर रंगांचे फुगे फोडणे, चेहऱ्याला रंग लावणे, रंगांची पावडर अंगावर टाकणे, अंगावर रंग फेकणे यामुळे काही वेळा डोळ्यात, कानात, तोंडात रंग जाऊ शकतो. त्याचे परिणाम शरीरावर होतात. कारण कृत्रिम रंगात काही रासायनिक घटक असतात. त्यांचा परिणाम आपल्या त्वचेवर होतो. अनेकांना कृत्रिम रंगांची ॲलर्जी असते. रासायनिक रंग पोटात गेल्यास अनेक विकार उद्भवू शकतात. त्यामुळे रसायनयुक्त रंग वापरण्याऐवजी पर्यावरणपूरक रंग वापरावेत. पर्यावरणपूरक रंग आता दुकानात विकतही मिळतात. परंतु ते खरेच पर्यावरणपूरक आहेत का ते पाहून घ्यावेत. तसेच नैसर्गिकरित्या घरी तयार केलेले पर्यावरण पूरक रंग वापरु शकतो.
चौकट-
रासायनिक रंग शरीराला हानिकारक ठरू शकतात. त्यामुळे कृत्रिम रासायनिक रंगांपेक्षा नैसर्गिक पर्यावरणपूरक रंग वापरण्यास चांगले आहेत. - डॉ. सचिन गोडसे, कुर्डुवाडी.
चौकट-
रासायनिक रंग घातक
लेड ऑक्साईड, ॲल्युमिनियम ब्रोमाइड, क्रोमियम आयोडाईड, शिसे, पारा यासह इतर अपायकारक रासायनिक पदार्थ वापरलेले असू शकतात. काही कोरड्या मानवनिर्मित रंगात वापरलेले अँसबेस्टॉस, खडू पावडर, सिलिका हे आरोग्याला घातक आहेत. या रंगामुळे त्वचा, श्वसनसंस्था, मूत्रसंस्था, डोळे, पोट, केस यासंबंधी आरोग्य समस्या निर्माण होवू शकतात.
घरी करता येण्यासारखे नैसर्गिक रंग
लाल, जांभळा- बीट
पिवळा- हळद, वाळलेली झेंडू फुले.
पिवळसर लाल- लालसर चंदन पावडर-
गुलाबी, तांबडा- गुलाब, जास्वंद.
हिरवा- पालक, हिरव्या पालेभाज्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

