
पुणे : ‘‘गेल्या दहा वर्षांपासून देशात नैसर्गिक आपत्तींची संख्या आणि तीव्रता लक्षणीयरीत्या वाढली आहे. आता पूर, चक्रीवादळे, भूकंप आणि भूस्खलन या केवळ कधीतरी घडणाऱ्या घटना राहिलेल्या नाहीत, तर त्या वारंवार घडणाऱ्या, देशावर विपरीत परिणाम घडवणाऱ्या समस्या बनल्या आहेत. या आपत्तींमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेवरच गंभीर परिणाम होत आहे. आर्थिक व्यवहार ठप्प पडतात, पायाभूत सुविधांचा नाश होतो. राज्य, जिल्हा प्रशासनावरही प्रचंड ताण येतो,’’ असे प्रतिपादन दक्षिणी कमांडचे प्रमुख लेफ्टनंट जनरल धीरज सेठ यांनी केले.