MNGL Gas
sakal
पुणे - पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील नैसर्गिक वायू पुरवठा अधिक सक्षम, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी ‘महाराष्ट्र नॅशनल गॅस लिमिटेड’ने (एमएनजीएल) ६५ किलोमीटर लांबीच्या स्टील ट्रंक पाइपलाइन (एसटीपीएल) प्रकल्पाला सुरुवात केली आहे. यामुळे शहराला नैसर्गिक वायूचा अतिरिक्त आणि पर्यायी स्रोत उपलब्ध होणार असून, वाढत्या सीएनजी व पीएनजी ग्राहकांच्या गरजा पूर्ण करण्यास मदत होणार आहे.