कऱ्हाड एसटीपासून मेट्रोच्या प्रवासापर्यंत निसर्ग फुलणार

कऱ्हाड एसटीपासून मेट्रोच्या प्रवासापर्यंत निसर्ग फुलणार
Published on

बसस्थानकांवरही निसर्ग संवर्धनाचा संदेश

जिल्ह्यात होणार जागृती; वन विभाग करणार योजनांचा प्रचार

सकाळ वृत्तसेवा
कऱ्हाड, ता. ६ ः धावपळीच्या आयुष्यात एसटीच्या खिडकीतून बाहेर बघताना किंवा रेल्वेच्या थांब्यावर उभे असताना व्यावसायिक जाहिरातीबरोबर हिरवीगार जंगले, वन्यजीव आणि वसुंधरा वाचवण्याचा संदेशही पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील रेल्वे आणि बस स्थानकांवरही निसर्ग संवर्धनाची चळवळ आकार घेणार आहे.
निसर्गाचे महत्त्व सामान्यांच्या दैनंदिन प्रवासाचा भाग बनवण्यासाठी वन विभागाने जोरदार तयारी केली आहे. त्यासाठी सहा कोटींची तरतूद केली आहे. वन, वन्यजीव व पर्यावरणाचे संरक्षणासह वृक्षाच्छादन वाढवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या व्यापक प्रचारासाठी वन विभागाने सहा कोटींहून अधिकचा निधी वितरित केला आहे. यंदाच्या आर्थिक वर्षात प्रचार, प्रसिद्धी व प्रशिक्षण योजनेंतर्गत ती रक्कम मंजूर केली आहे. जागतिक तापमानवाढ आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर सामान्य नागरिकांत पर्यावरणाविषयी जागृती निर्माण करणे आवश्यक झाले आहे. त्यासाठी वन विभागामार्फत बस आणि रेल्वेसारखी सार्वजनिक वाहतुकीची साधने, सामाजिक माध्यमातून जागृती मोहीम राबवली जाणार आहे. त्यासाठी एक कोटी ७१ लाखांच्या निधीची तरतूद केली आहे. आतापर्यंत १४ दिवसांचे काम पूर्ण झाल्याचा दावा शासनाने केला आहे. त्यासाठीचा आवश्यक निधीही दिला आहे.

कोट -
------
शासनाने वन विभागाच्या प्रकल्पासहित अन्य जागृतीबाबत काही धोरण आखले आहे. त्याची अंमलबजावणी सामाजिक वनीकरण विभागातर्फे होणार आहे. अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांचे जिल्हाभर नियोजन होणार आहे. निधी आल्यानंतर त्याचा आराखडा आखला जाणार आहे.

- अमोल सातपुते, उपवनसंरक्षक.

-----------------------

सचिन शिंदे...11:36 05-08-2026

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com