निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई दोन वर्षांनी | Pune | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शेतकऱ्यांना दिलासा
पुणे - निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई दोन वर्षांनी

पुणे : निसर्ग चक्रीवादळाची नुकसान भरपाई दोन वर्षांनी

पुणे : राज्यासह पुणे जिल्ह्यात जून २०२० मध्ये निसर्ग चक्रीवादळात शेत, घर, गोठ्यचे नुकसान झाले. त्याच्या भरपाईचे जिल्ह्यासाठी ८ कोटी ४० लाख रुपये मंजूर झाले आहेत. लवकरच ही मदत शेतकऱ्यांना बॅंक खात्‍यात जमा होणार आहे.

चक्रीवादळामुळे जिल्ह्यातील जुन्नर, खेड, आंबेगाव, मावळ, मुळशी हवेली या तालुक्यांना मोठा फटका बसला होता. चक्रीवादळाच्या फटक्याने दीड हजारांपेक्षा अधिक घरे, गोठे, पॉलिहाउस, कांदा चाळी, शेडनेट यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. यासाठी पहिल्या टप्प्यासाठी ७७ कोटींचा निधी मंजूर झाला होता.

हेही वाचा: नागपुर : विद्यापीठ कर्मचारी जाणार संपावर

मात्र या निधीमध्ये सर्व नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा समावेश होत नव्हता. त्यामुळे उर्वरित नुकसानग्रस्त सर्व पात्र शेतकऱ्यांसाठी ८ कोटी ४० लाख रुपयांच्या निधीच्या मागणीचा प्रस्ताव जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी शासनाला पाठविला होता. या प्रस्तावाला शासनाने मंजुरी दिली. त्यामुळे हा निधी तातडीने संबंधित तालुक्यांना वर्ग करण्यात आला आहे. लवकरच नुकसानभरपाईची रक्कम शेतकऱ्यांच्या बॅंक खात्यावर जमा करण्यात येणार आहे.

loading image
go to top