
पुणे : ‘‘निसर्गाने पुणे जिल्ह्याला भरभरून दिले आहे. जगभरातील पर्यटक आकर्षित होतील, अशी विविधता आणि नैसर्गिक समृद्धी आहे. हे लक्षात घेऊनच जिल्हा प्रशासनाने पर्यटन आराखडा तयार केला आहे. त्याची अल्पावधीतच अंमलबजावणी करण्यात येणार आहे. त्यातून जिल्ह्याच्या अर्थव्यवस्थेला चालनाही मिळेल,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी सोमवारी दिली.