

PNE26W56861
सोलापूर : अ. भा. मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्यपरिषद करंडक २०२६’ या स्पर्धेत एकांकिका सादर करताना कलावंत.
---
‘नाट्यपरिषद करंडक २०२६’चा पडदा उघडला
सोलापुरात राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीला उत्स्फूर्त प्रतिसाद
सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. ११ : महाराष्ट्राच्या समृद्ध नाट्यपरंपरेचा वारसा जपत नवोदित कलावंतांना व्यासपीठ उपलब्ध करून देणाऱ्या अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, मुंबई आयोजित राज्यस्तरीय ‘नाट्यपरिषद करंडक २०२६’ या एकांकिका स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचा शुभारंभ शनिवारी (ता. १०) मुळे सभागृहात झाला. स्पर्धेचे उद्घाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, शाखा सोलापूरचे अध्यक्ष प्रकाश यलगुलवार यांच्या हस्ते झाले. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. बसवराज सलगर उपस्थित होते.
यावेळी उपनगरीय शाखेचे अध्यक्ष विजयकुमार साळुंके, महानगर शाखेचे अध्यक्ष प्रा. अजय दासरी, बार्शी शाखेचे अध्यक्ष सोमेश्वर घाणेगावकर, मंगळवेढा शाखेचे प्रमुख कार्यवाह यतिराज वाकळे, पंढरपूर शाखेचे दत्तात्रय जगताप, स्पर्धेचे केंद्रप्रमुख सुमीत फुलमामडी, आशुतोष नाटकर, नागेंद्र माणेकरी आणि सोलापूर शाखेचे प्रमुख कार्यवाह प्रा. जोतिबा काटे उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध केंद्रांवर ही स्पर्धा सुरू असून, प्राथमिक फेरीत सोलापूर केंद्रावर सर्वाधिक एकांकिका सादर होणार असल्याची माहिती विजयकुमार साळुंके यांनी प्रास्ताविकात दिली. स्थानिक कलावंतांचा उत्स्फूर्त सहभाग आणि शहरातील नाट्यप्रेमाची परंपरा यामुळे सोलापूर केंद्राकडे विशेष लक्ष लागले आहे.
ॲड. सलगर यांनी सहभागी कलावंतांना शुभेच्छा दिल्या. अध्यक्षीय भाषणात प्रकाश यलगुलवार यांनी नाट्य परिषदेच्या उपक्रमाचे कौतुक केले. सोलापूर ही कलावंतांची भूमी आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून उत्तम अभिनेते, तंत्रज्ञ, दिग्दर्शक आणि लेखक घडतील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
सूत्रसंचालन सारिका अग्निहोत्री यांनी केले, तर प्रा. जोतिबा काटे यांनी आभार मानले.
---
पहिल्या दिवशी आठ एकांकिकांचे सादरीकरण
पहिल्या दिवशी वैभव दीप संस्थेची ‘मैं हू ना’, आनंद रंग कला मंचची ‘सांत्वन’, अबीर एंटरटेन्मेंट प्रॉडक्शनची ‘पुंडली हरी वर्धा’, अस्तित्व मेकरची ‘तुटण्याआधी’, व्ही. नायक संस्थेची ‘दारुडे’, अस्तित्व मेकर्स फाउंडेशनची ‘लज्जा सोडून द्यावी’, रंग संवाद संस्थेची ‘मैतर’ आणि संकल्प यूथ फाउंडेशनची ‘तो क्षण’ या आठ एकांकिका सादर झाल्या.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.