कास - नाती गोती काढून मत मागायला येणाराना उभं करू नका.... शिवेंद्रसिंहराजे भोसले

कास - नाती गोती काढून मत मागायला येणाराना उभं करू नका.... शिवेंद्रसिंहराजे भोसले

Published on

नात्या- गोत्यातून मते मागणाऱ्यांना उभं करू नका

शिवेंद्रसिंहराजे भोसले; कुसुंबीत भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत आवाहन

कास, ता. ३ ः निवडणूक आली की नाती- गोती काढून मते मागायला येतात, निवडणूक झाली की परत मुंबईला गायब होतात. तुमच्या कामांसाठी चोवीस तास उपलब्ध असणारा लोकप्रतिनिधी मी असून, कामापुरते येणाऱ्यांना दारात उभं करू नका, असे आवाहन सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले.
कुसुंबी येथे कुसुंबी जिल्हा परिषद गटाच्या भाजप उमेदवार अर्चना रांजणे व गणाच्या उमेदवार पुष्पा चिकणे यांच्या प्रचारार्थ आयोजित कोपरा सभेत ते बोलत होते.
या वेळी माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, जिल्हा बँकेचे संचालक ज्ञानदेव रांजणे, उमेदवार अर्चना रांजणे, पुष्पा चिकणे, विठ्ठलराव देशमुख, सागर धनावडे, बाळासाहेब देशमुख, शिवाजीराव मर्ढेकर, तुकाराम धनावडे, एकनाथ पवार आदींसह परिसरातील ग्रामस्थ, महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मंत्री भोसले म्हणाले, ‘‘तुमच्या सर्वांच्या सहकार्याने मला मंत्रिपद मिळाले असून, आपण आता देणारे झालो आहोत. त्यामुळे जावळीच्या विकासासाठी नेहमीच झुकत माप राहिले. आज पाचवड कुडाळवरून मेढामार्गे कोकणाला जोडणारा सर्वात मोठा रस्ता होत आहे, नवीन महाबळेश्वर प्रकल्पाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती होणार आहे अशा अनेक कामांच्या माध्यमातून लोकांचा विकास होत असताना विरोधकांनी एक रुपयाचे काम केले नसताना मत मागायला मात्र येत आहेत. निवडणूक विकासाच्या मुद्द्यावर लढवली गेली पाहिजे.’’
श्री. सपकाळ म्हणाले, ‘‘मी भाजपमध्ये जाण्याचा घेतलेला निर्णय तुम्हाला आवडला का असे लोकांना विचारले, यावर लोक हो म्हणताच तुम्ही सर्व बाबाराजेंवर प्रेम करता तर मी तरी एकटा जीव सदाशिव म्हणून राहून काय करू. बाबांच काम, स्वभाव, पाहून मी भाजपमध्ये जाण्याचा निर्णय घेतला. विकासाकामात तालुक्याला संधी मिळत असताना इगो मनात ठेवण्यापेक्षा काम महत्त्वाचे म्हणून मी निर्णय घेतला.’’
श्री. रांजणे यांनी विरोधकांनी एकत्रित येऊन बाबाराजेंना रोखण्यासाठीचे प्रयत्न करत असले, तरी त्यांना यात कधीत यश येणार नाही. एक छदाम सुद्धा न आणणारे आज विकासाच्या गप्पा मारत नाती-गोती सांगून मत मागत आहेत. त्यांना कायमच हद्दपार करा, असे आवाहन त्यांनी केले.
एकनाथ पवार, चंद्रकांत वेंदे यांनीही मनोगत व्यक्त केली. मंडल अध्यक्ष मारुती चिकणे यांनी प्रास्ताविक केले. अंकुश शेलार यांनी आभार मानले.
--------------------------------
04510
कुसुंबी : भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ सभेत बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले, व्यासपीठावर सदाशिवराव सपकाळ, ज्ञानदेव रांजणे आदी. (अर्चना पवार : सकाळ छायाचित्रसेवा)
----------------------------------

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com