Navale Bridge Accident
sakal
पुणे - नवले पुलाच्या परिसरात होणारे अपघात टाळण्यासाठी म्हणून दीर्घकालीन उपाययोजना करणार, नवले पूल-वडगाव पूलला जोडणारा नवा पूल उभारला जाणार, समतल विगलक करणार अशा अनेक घोषणा तीन वर्षापूर्वी करण्यात आल्या होत्या. त्याचा आराखडा तयार करून तो केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठविण्यात आला होता.