

pune accident
esakal
Pune Latest News: नवले पुलाकडून कात्रजकडे जात असताना प्रवासी वाहतूक करणाऱ्या आराम बसच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाला. तर या अपघातात त्याच्यासोबत असलेली दुचाकीवरील सहप्रवासी तरुणी जखमी झाली. हा अपघात गुरुवारी (ता. १२) रात्री पावणे दहा वाजता झाला असून याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी अज्ञात बसचालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे.