

navale bridge accident
esakal
पुणे - पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील नवले पूल परिसर मागील पाच वर्षांत शहरातील सर्वात धोकादायक ठिकाण बनला आहे. सतत घडणाऱ्या अपघातांमुळे हा भाग अक्षरशः ‘डेथ झोन’ बनला आहे. रस्ते अभियांत्रिकीतील चुका, अवजड वाहनांची ढिसाळ तपासणी आणि वेगावरील नियंत्रणाचा अभाव या बाबींकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचे स्पष्ट झाले आहे.