

Navale Bridge to Get Alternative Route as Pune Ring Road Project Gains Pace
esakal
पुण्यातील नवले पुलावर वारंवार मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याने प्रवाशांमध्ये चिंता वाढली होती. तीव्र उतार, वाहनांची प्रचंड संख्या आणि सततची वर्दळ यामुळे हा पूल धोकादायक ठरत आहे. कोल्हापूर, सातारा येथून मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे. मात्र, आता या पुलावरील भार कमी करण्यासाठी एक महत्त्वपूर्ण पर्याय उपलब्ध होणार आहे, ज्यामुळे अपघातांचा धोका कमी होण्यास मदत होईल.