Pune News: नवले पुलावर आता आधुनिक पहारा; पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले सीसीटीव्ही, हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे

Navale Bridge Gets State-of-the-Art Surveillance: नवले पुलावर १४ सीसीटीव्ही आणि ३ हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे बसवले; पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले. वेगमर्यादा ४० किमी/तास, रंबल स्ट्रिप्स आणि डिजिटल बोर्डांद्वारे अपघात प्रतिबंध, रिअल-टाइम निरीक्षण सुविधा.
Pune News

Pune News

esakal

Updated on

पुणे: नवले पूल परिसरातील अपघात आणि वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने १४ सीसीटीव्ही कॅमेरे आणि तीन ‘हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे’ बसविले आहेत. हे कॅमेरे थेट पोलिस नियंत्रण कक्षाशी जोडले आहेत, ज्यामुळे २४ तास प्रत्यक्ष वेळेतील निरीक्षण (रिअल-टाइम मॉनिटरिंग) शक्य होईल आणि अपघात झाल्यास तत्काळ मदत मिळेल.

नवले पूल परिसरात अपघाताचे प्रमाण कमी करण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने विविध टप्प्यांवर प्रयत्न केले. काही दिवसांपूर्वी सीसीटीव्ही कॅमेरे आणि ‘हायस्पीड गॅन्ट्री कॅमेरे’ बसविले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com