

नवी मुंबईचे पाणी कुणालाही देणार नाही: गणेश नाईक
नवी मुंबई, ता. ७ : खारघर आणि परिसरासाठी नवी मुंबई महापालिकेकडे पाणी मागणाऱ्या आणि पाणी न दिल्यास ४०० कोटींची नोटीस बजावणाऱ्या सिडकोला वनमंत्री गणेश नाईक यांनी सुनावले आहे. नवी मुंबई महापालिका ही दुबळ्या लोकांची नाही. पाणी न दिल्याच्या कारणावरून नोटीस काढण्याची दादागिरी कोणी करीत असेल, तर ती खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा त्यांनी दिला आहे. नाईक यांनी आज नवी मुंबईतील विकासकामांची पाहणी केली. यादरम्यान त्यांनी सिडकोला पाणी देणार नसल्याचेही स्पष्ट केले.
सिडकोने नवी मुंबई महापालिकेकडे ५७ एमएलडी पाण्याची मागणी केली होती. पालिकेने नकार दिल्यानंतर सिडकोने थकीत रकमेचे कारण देत ४०० कोटींची नोटीस पाठवली. यावर बोलताना नाईक म्हणाले, की अशी नोटीस काढण्याची हिंमत कोणी केली असेल तर त्यांना नक्कीच पश्चात्ताप करावा लागेल. कायमस्वरूपी पाणी देत नाही म्हणून कुणी दादागिरी करीत असेल, तर ती मोडून काढली जाईल. मोरबे धरणाचे पाणी प्रामुख्याने नवी मुंबईच्या लोकांसाठीच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. माणुसकीच्या दृष्टिकोनातून ते म्हणाले, की पाणी अतिरिक्त असेल किंवा इतर कुठे जलवाहिनी फुटली असेल, तर एखाद्या आठवड्यासाठी आम्ही आमच्या नागरिकांना थोडे कमी पाणी वापरण्याची विनंती करून नक्कीच पाणी देऊ; पण हक्काचे पाणी कायमस्वरूपी अन्य कुणालाही देणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.