सांगवीत ज्येष्ठ, विकलांग लोकांच्या लसीकरणासाठी 'कोरोना व्हॅक्सिन वाहतूक रथ'

Corona Vaccine rath
Corona Vaccine rath

जुनी सांगवी : जुनी सांगवीत कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी ज्येष्ठ नागरिक, अपंग विकलांग नागरिकांच्या लसीकरणासाठी 'कोरोना व्हॅक्सिन वाहतूक रथ' तयार करण्यात आला आहे. जुनी सांगवी येथील कै. शकुंतलाबाई शितोळे शाळा येथील लसीकरण केंद्रावर परिसरातील ज्येष्ठ, दिव्यांग, विकलांगांच्या सोयीसाठी बॅटरिवर चालणा-या मिनी जिपची घर ते लसीकरण केंद्र अशी 'कोरोना व्हॅक्सिन रथ-या नावाने वाहतूकीची सुविधा करण्यात आली आहे. यामुळे ऐन कडक उन्हाळ्यात लसीकरण केंद्रावर ये जा करण्यासाठी होणारा त्रास वाचण्यासाठी ज्येष्ठांना मदत होत आहे. साधारण साडेपाच फुटी उंचीची ही इलेक्ट्रिकल जिप ॲटोमेटिक आहे.

एरव्ही आठजण यातून प्रवास करू शकतात. तर सोशल अंतर पाळले जावे यासाठी लसीकरणासाठी चार व्यक्तींना घेवून जुनी सांगवी परिसरात हा रथ धावत आहे. चांगले सस्पेन्शनमुळे खड्डेमय रस्ता असला तरी प्रवास आल्हादायक व्हावा, अरुंद गल्ली बोळात ही सहज ये जा करता येत असल्याने हा कोरोना व्हॅक्सिन लसिकरण वाहतूक रथ' नागरिकांच्या सोयीचा ठरत आहे.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा
प्रशांत शितोळे मित्र परिवाराकडून सांगवी परिसरातील नागरिकांसाठी हा रथ तयार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. तर वेटींग हॉलमध्ये नागरिकांचा विरंगुळा व्हावा यासाठी एलएडी टी.व्ही. लावण्यात आले आहेत. याबाबत प्रशांत शितोळे म्हणाले, लसीकरणाबाबत जनजागृती व्हावी, लसीकरणाचा टक्का वाढावा. उन्हाळ्यात ज्येष्ठ अपंगांना मदत व्हावी हा यामागील उद्देश आहे.'

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com