Navle Bridge Accident : नवले पुलाजवळ पुन्हा अपघात; दगडी कोळसा वाहून नेणारा कंटेनर उलटला

हा कंटेनर 100 मीटर पर्यंत फरफटत आला आहे
Navle Bridge Accident
Navle Bridge AccidentSakal

धायरी : मुंबई बंगळुरू महामार्गावर पुण्यातील नऱ्हे परिसरात नवले पुलाजवळील भूमकर पुलावर कंटेनर सकाळी साडेदहाच्या सुमारास पलटी झाल्याची घटना घडली आहे. हा कंटेनर साताऱ्याकडून मुंबईच्या दिशेने कोळसा वाहून नेत होता. या अपघातात कुठल्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही.

अधिक माहितीनुसार, भूमकर पुलाजवळ हा कंटेनर अक्षरशः लोखंडी दुभाजक तोडून विरुद्ध दिशेला जाऊन उलटला असून, कंटेनर मधील कोळसा महामार्गावर पसरला आहे. तर या ठिकाणी बघ्याची मोठी गर्दी झाली आहे. अपघातात कंटेनरचा चालक जखमी झाला असून त्याला खासगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

Navle Bridge Accident
Manali Rain Video : भिंत खचली, चूल विझली! पाहता पाहता स्टेट बँक गेली वाहून; पुराचे थरकाप उडवणारे व्हिडिओ

दुभाजक तोडून कंटेनर रस्त्याच्या विरूद्ध दिशेला जवळपास १०० मीटरपर्यंत फरपटत आल्याची माहिती आहे. घटनास्थळी सिंहगड वाहतूक विभाग दाखल झाले असून मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली आहे. पोलिसांकडून वाहतूक सुरळित करणाचे प्रयत्न सुरू आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com