Video : येवले चहासंदर्भात संचालकांचे स्पष्टीकरण

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 25 सप्टेंबर 2019

गेले दोन दिवस असा मेसेज फिरतोय की, येवले चहामध्ये मेनामाईन नावाचा घातक पदार्थ वापरला जातो व तो ग्राहकांच्या जीवासाठी घातक आहे. पण असा कोणताही पदार्थ आम्ही आमच्या चहात वापरत नाही.

पुणे : सध्या महाराष्ट्रभरात फेमस असलेला चहा म्हणजे 'येवले चहा'! काल (ता. 24) येवले चहावर एफडीएची कारवाई झाली. या कारवाईमुळे येवले चहाच्या ब्रँण्डबद्दल अनेक उलट-सुलट चर्चा झाली. यावर येवलेचे संचालक नवनाथ येवले यांनी स्पष्टीकरण दिले आहे.

गेले दोन दिवस असा मेसेज फिरतोय की, येवले चहामध्ये मेनामाईन नावाचा घातक पदार्थ वापरला जातो व तो ग्राहकांच्या जीवासाठी घातक आहे. पण असा कोणताही पदार्थ आम्ही आमच्या चहात वापरत नाही. एफडीएच्या अधिकाऱ्यांनी जेव्हा आमच्या कारखान्याची पाहणी केली, तेव्हा पॅकिंगसंदर्भात काही त्रुटी आढळून आल्या होत्या, पण त्याची पूर्तता आम्ही केली आहे. प्रसारमाध्यमात जो मेसज व्हायरल होतोय तो खोटा आहे. ग्राहकांच्या जीवाशी खेळायचा आम्हाला अधिकार नाही, त्यामुळे ग्राहकांनी अशा अफवांवर विश्वास ठेवू नये. आमच्या सर्व फ्रँचायजी चालू राहतील. असे स्पष्टीकरण नवनाथ येवले यांनी दिली.  

येवले चहासाठी वापरल्या जाणाऱ्या पावडर, मसाला, साखरेच्य नमून्यांची प्रयोगशाळेकडून तपासणी करण्यात आलेली नाही. तसेच त्यांच्याकडे माल विक्रीचा परवाना नसल्याने अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) येवले चहाला दणका देत सहा लाख रुपयांचा माल जप्त केला होता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Navnath Yeole director of Yeole Amrutatulya gives explanation on FDA action

टॅग्स