‘मिरर वर्क’, ‘अजरख’ प्रिंट्सला पहिली पसंती

‘मिरर वर्क’, ‘अजरख’ प्रिंट्सला पहिली पसंती
Published on: 

‘उत्सव नवरात्रीचा...’ (लोगो)
----------------

पिंपरी, ता. ५ ः शारदीय नवरात्रोत्सवाचे काऊंटडाऊन सुरू झाले असून, यंदाच्या गरबा आणि दांडिया नाईट्स गाजवण्यासाठी तरुणाई सज्ज झाली आहे. नवरात्री फॅशनमध्ये कॉटन आणि मलमल कापडावरील पारंपरिक अजरख डिझाइन्स आणि डिजिटल बांधणी प्रिंट्सच्या इंडो-वेस्टर्न कुर्ती व स्कर्ट्सना मागणी आहे. स्थानिक बाजारपेठांमध्ये वजनाने हलके आणि जास्त घेर असणाऱ्या ‘गामठी’ चनिया-चोली सर्वाधिक मागणी आहे. रात्रीच्या प्रखर दिव्यांमध्ये चमकणारे आणि कच्छी एम्ब्रॉयडरीचे नक्षीकाम असलेले घागरे तरुणींचे मुख्य आकर्षण ठरत आहेत.
यंदा कापड बाजारात सर्वसामान्यांपासून ते प्रीमियम ग्राहकांपर्यंत सर्वांसाठीच विविध रेंज उपलब्ध आहेत. साध्या आणि हलक्या फुलक्या इंडो-वेस्टर्न कुर्तींची किंमत १२०० रुपयांपासून सुरू होत आहे. तर तरुणींची पहिली पसंती असलेल्या ‘खऱ्या मिरर वर्क ’ आणि ‘अजरख प्रिंट’ चनिया-चोलीचे दर १५०० ते सहा हजारच्या दरम्यान आहेत. १० मीटर घेर असलेल्या भारी डिझायनर लेहेंगा पॅकेजची किंमत चार हजारपर्यंत आहे.

पुरुषांसाठी लखनवी कुर्ते
गरब्यासाठी केवळ तरुणीच नव्हे, तर तरुणही मागे नाहीत. पुरुषांच्या फॅशनमध्ये लखनवी कुर्ते, डिजिटल प्रिंटेड जॅकेट्स आणि केडिया प्रकारातील पारंपरिक कपड्यांची विक्री जोरात सुरू आहे. मुलांमध्येही ऑक्साइडची कडी आणि गळ्यातील पेंडंट्सची क्रेझ दिसून येत आहे.

दागिन्यांमध्ये ‘ऑक्सिडाइज्ड स्टेटमेंट चोकर’
पारंपरिक पोशाखाचा लुक पूर्ण करण्यासाठी यंदा ‘ब्लॅक मेटल’ म्हणजेच ऑक्सिडाइज्ड दागिन्यांचे नवे कलेक्शन बाजारात आले आहे. नवरात्रीच्या गरबा नाईट्समध्ये साध्या कपड्यांनाही ग्लॅमरस लुक देणाऱ्या या दागिन्यांनी बाजारपेठा काबीज केल्या आहेत. ५० ते ३५० रुपयांच्या रेंजमध्ये आकर्षक अंगठ्या आणि कानातल्यांचे शेकडो प्रकार उपलब्ध केले आहेत. गळ्यातील नक्षीदार ‘स्टेटमेंट चोकर’ आणि लांब माळा २५० ते १,२०० रुपयांपर्यंत मिळत असून, संपूर्ण मॅचिंग ज्वेलरी सेटचे कॉम्बो पॅक ८०० रुपयांपासून पुढे उपलब्ध आहेत.

दागिन्यांचा प्रकार ः किंमत (रुपये)
चंकी स्टेटमेंट चोकर ः २५० ते ८००
हेवी मल्टी-लेअर लांब माळा ः ४०० ते १,२००
ओव्हरसाईज्ड चांदबाली आणि झुमके ः १०० ते ३५०
स्टॅकेबल कडे आणि नक्षीदार बांगड्या ः ८० ते ३००
मोठ्या कॉकटेल अंगठ्या ः ५० ते १५०
संपूर्ण ज्वेलरी सेट ः ८०० ते २,५००

कपड्यांचा प्रकार व डिझाईन किंमत (रुपये)
मिरर वर्क चनिया-चोली ः १५०० ते ४०००
पारंपरिक ‘अजरख’ प्रिंट चनिया-चोली ः २२०० ते ६९९०
इंडो-वेस्टर्न कुर्ती व स्कर्ट्स सेट ः १,२०० ते ३,००० रुपये

नवरात्रीसाठी कापड बाजारात खूप चांगला उत्साह आहे. तरुण-तरुणींनी खरेदीसाठी बाजारात गर्दी केली आहे. यंदा गरबाप्रेमींचा कल वजनाने हलक्या पण दिसायला हेवी असणाऱ्या ‘अजरख प्रिंट’ आणि रिअल ‘मिरर वर्क’ चनिया-चोलीकडे जास्त आहे. ग्राहकांचे बजेट लक्षात घेऊन आम्ही अगदी १५०० रुपयांपासून ते अगदी डिझायनर कलेक्शनपर्यंत सर्व व्हरायटी उपलब्ध केली आहे.
- रामकरण माळी, मालक व कपडे व्यावसायिक

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com