
जेजुरी : जेजुरी जवळील नाझरे धरण (मल्हार सागर) बुधवारी पुर्ण क्षमतेने भरून वाहू लागले. धरणाच्या पुढील कऱ्हा नदी सकाळपासून प्रवाहीत झाली. सुमारे ५७८ क्युसेक वेगाने पाणी नदीत वाहु लागले आहे. जून महिन्यात नाझरे धरण भरल्याची गेल्या काही वर्षातील पहिलीच घटना आहे.