NCC Modern Skills: एनसीसी’ छात्रांना मिळणार ड्रोन, सायबर सुरक्षेचे धडे

ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन आणि नेतृत्व प्रशिक्षणातून एनसीसी छात्रांना ‘विकसित भारत २०४७’च्या भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज करण्याचा प्रयत्न
NCC Cadets to Receive Training in Drone Technology and Cyber Security

NCC Cadets to Receive Training in Drone Technology and Cyber Security

Sakal

Updated on: 

प्रज्वल रामटेके

पुणे : ‘राष्ट्रीय छात्र सेना’ (एनसीसी) म्हणजे केवळ कवायत, शिस्त आणि शारीरिक कसरती, असा सर्वसामान्य समज आहे. मात्र, बदलत्या काळानुसार ‘एनसीसी’ने आता कात टाकली असून, ‘विकसित भारत २०४७’च्या उद्दिष्टानुसार छात्रांना भविष्यातील आव्हानांसाठी सज्ज केले जात आहे. ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, आपत्ती व्यवस्थापन, नेतृत्व, व्यक्तिमत्त्व विकास आणि सामाजिक बांधिलकी यांसारख्या क्षेत्रांत छात्रांना प्रशिक्षण दिले जात आहे, अशी माहिती ‘एनसीसी’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com