

NCC Cadets Learning Modern Skills
Sakal
पुणे, : लष्करी प्रशिक्षणापुरते मर्यादित न राहता राष्ट्रीय छात्र सेनेच्या (एनसीसी) छात्रांना आता बदलत्या रोजगारविश्वासाठी आणि भविष्यातील आव्हानांसाठी तयार करण्यावर भर दिला जात आहे. ड्रोन तंत्रज्ञान, सायबर सुरक्षा, चिकित्सक विचार, सांघिक काम आणि नेतृत्वगुणांचे धडे गिरवलेल्या या छात्रांसाठी कॉर्पोरेट क्षेत्रातील रोजगाराचे दरवाजेही खुले होत आहेत. याबाबतचे विशेष प्रयत्न ‘एनसीसी’ महासंचालनालयाकडून सुरू आहेत, अशी माहिती ‘एनसीसी’चे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांनी दिली.