Pune :  पुण्यात पार पडले एनसीसी’चे प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ncc

 पुण्यात पार पडले एनसीसी’चे प्रशिक्षण शिबिर

पुणे : राष्ट्रीय छात्र सेनेचे (एनसीसी) वार्षिक प्रशिक्षण शिबिर (एटीसी) नुकतेच पुणे एनसीसी मुख्यालयात पार पडले. २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनच्या वतीने आयोजित या शिबिरात ७५ एनसीसी कॅडेट्सने सहभाग घेतला होता. हे शिबिर ८ ते १७ नोव्हेंबर या कालावधित पार पडला.

एनसीसीच्या २ महाराष्ट्र गर्ल्स बटालियनचे कमांडिंग ऑफिसर कर्नल अनिरुद्ध वाले, सुभेदार मेजर कृष्णा दास, एएनओ सुजाता गटणे, गर्ल्स कॅडेट इंस्ट्रक्टर रिता खंडागळे, दीपाली दास आणि नंदिता सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली हे शिबिर संपन्न झाले. यामध्ये संचलन, खोखो, नेमबाजी सारख्या विविध स्पर्धा घेण्यात आल्या. तसेच फेब्रुवारी २०२२ मध्ये होणाऱ्या एनसीसीच्या ‘बी’ आणि ‘सी’ सर्टिफिकेट परिक्षेसाठी कॅडेट्सला प्रशिक्षण देण्यात आले. या व्यतिरिक्त मॅप रीडिंग, नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापण आदी विषयांचे प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात आले.

दरम्यान, एनसीसी मुख्यालयात २६ जानेवारी २०२२ साठी दिल्लीतील ‘रिपब्लिक डे परेड’साठी (आरडीसी) कॅडेट्सला प्रशिक्षण देण्यात येत असून यामध्ये राज्यातील विविध एनसीसी ग्रुप्सच्या ७५ ते ८० कॅडेट्सचा समावेश आहे. तर येत्या १८ डिसेंबरला हे कॅडेट्स आरडीसीसाठी दिल्लीला रवाना होणार असल्याचा माहिती एनसीसी मुख्यालयाच्या वतीने देण्यात आली.

loading image
go to top