sambhaji holkar, vittal shinde and rajendra korekar
sakal
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेसने पुणे शहरात दोन अध्यक्षांची नियुक्ती केल्यानंतर जिल्ह्यातही अशीच पद्धत अवलंबली आहे. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तीन जिल्हाध्यक्षांची नियुक्ती केली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी संभाजी होळकर, विठ्ठल शिंदे आणि राजेंद्र कोरेकर यांची नियुक्ती केली असल्याचे बुधवारी पत्रकार परिषदेत जाहीर केले.