Vidhan Sabha 2019 : चिंचवडमध्ये राष्ट्रवादीच्या उमेदवाराचाच अर्ज बाद

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 5 ऑक्टोबर 2019

Vidhan Sabha 2019 :पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता राहुल कलाटे आता हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Vidhan Sabha 2019 : पिंपरी : चिंचवड विधानसभा मतदारसंघासाठीचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार प्रशांत शितोळे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाला आहे. त्यामुळे आता राहुल कलाटे आता हेच राष्ट्रवादीचे उमेदवार असतील अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

चिंचवडमध्ये 19 उमेदवारांनी 28 अर्ज दाखल केले आहेत. यात महायुतीचे लक्ष्मण जगताप यांच्यासह बंडखोरी केलेले शिवसेनेचे राहुल कलाटे व महाआघाडीचे प्रशांत शितोळे यांचा समावेश होता. दोघांनी शक्तिप्रदर्शन करत अर्ज भरले होते. पण आज शितोळे यांचा अर्ज निवडणूक आयोगाकडून अवैध ठरविण्यात आला आहे. त्यामुळे राहुल कलाटे आणि लक्ष्मण जगताप यांच्यात थेट लढत पाहायला मिळणार आहे.

कलाटे यांनी वाकडमधून रॅली काढली होती. कलाटे यांच्यासमवेत नवनाथ जगताप होते. थेरगाव येथील डांगे चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून चिंचवडगावमार्गे नवनगर विकास प्राधिकरण कार्यालय इमारतीपर्यंत रॅली काढली. निवडणूक निर्णय अधिकारी मनीषा कुंभार यांच्या कार्यालयाबाहेर प्रचंड गर्दी होती.  जनहित लोकशाही पक्षातर्फे तृतीय पंथी नताशा लोखंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate application in Chinchwad constituency was dropped in Maharashtra Vidhan sabha 2019