Vidhan Sabha 2019 : इंदापूरात राष्ट्रवादीच्या दत्तात्रय भरणेंचे जोरदार शक्तीप्रदर्शन

राजकुमार थोरात
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. इंदापूर शहरातून भव्य रॅलीस सुरुवात झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सभेला उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

वालचंदनगर : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार दत्तात्रय भरणे यांनी उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. इंदापूर शहरातून भव्य रॅलीस सुरुवात झाली आहे. माजी उपमुख्यमंत्री अजित पवार सभेला उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते.

इंदापूरच्या विधानसभेची निवडणूक राष्ट्रवादीचे दत्तात्रय भरणे व भाजपचे हर्षवर्धन पाटील यांच्यामध्ये अटीतटीची  होणार आहे. हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस व पवार कुटुंबावर टीका केल्यामुळे  पवार कुटुंबासाठी इंदापूरची निवडणूक प्रतिष्ठेची  झाली आहे. त्यामुळेच इंदापूरच्या निवडणूकीकडे राज्याचे लक्ष लागले. 

आज सकाळपासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आमदार भरणे यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याची जोरदार तयारी केली होती. तालुक्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते इंदापूर शहरात दाखल झाले आहेत. इंदापूर शहरातील अकलूज नाक्यापासून भव्य रॅलीला सुरुवात झाली. दत्तामामा भरणे तुम आगे बढो.. हम तुम्हारे पीछे है, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा विजय असो..... अशा घोषणा देण्यात आल्या.

उमेदवारी अर्ज दाखल करण्यास माजी मुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार असल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते . राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate Dattatray Bharne rally gets huge response in Indapur for Maharashtra Vidhan Sabha election