बारामती : पंचायत समितीवर राष्ट्रवादीच्या उमेदवारांची बिनविरोध निवड

मिलिंद संगई
Tuesday, 31 December 2019

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या दोघांची आज (मंगळवार) बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती संजय भोसले व उपसभापती शारदा खराडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

बारामती : बारामती तालुका पंचायत समितीच्या सभापतीपदी नीता बारवकर यांची तर उपसभापतीपदी प्रदीप धापटे यांची आज निवड करण्यात आली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या सूचनेनुसार या दोघांची आज (मंगळवार) बिनविरोध निवड करण्यात आली. सभापती संजय भोसले व उपसभापती शारदा खराडे यांनी पदाचा राजीनामा दिल्यानंतर ही जागा रिक्त झाली होती.

आज झालेल्या बैठकीत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी बारवकर व धापटे यांच्या नावाची सूचना केली. त्या नंतर या दोघांनी पदासाठी अर्ज दाखल केले. त्यांची निवड बिनविरोध झाली. बारामती तालुका पंचायत समितीवर राष्ट्रवादीचे निर्विवाद वर्चस्व आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP candidate elected as unopposed in Baramati Panchyat Samiti