मावळात शरद पवार म्हणाले, मंत्रीजी दूसरा कुछ काम मिलता है तो देखलो

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 12 October 2019

मावळ विधानसभा मतदार संघासाठी तळेगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उपस्थित जन समुदाय पाहता शरद पवारांनी विरोधक उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर जोरदार टीका केली. 

तळेगाव : विधानसभेचा प्रचार रंगात आला असून, मावळ मतदारसंघासाठी तळेगावमध्ये घेण्यात आलेल्या सभेची गर्दी बघताच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यमंत्री बाळा भेगडे यांना चांगलाच टोला लगावला. मंत्रिमंडळातील मंत्री महोदय यहा कुछ बदलाव आ चुका है, दूसरा कुछ काम मिलता है तो देखलो, असा पवारांनी आपल्या शैलित टोला लगाविला. 

मावळ विधानसभा मतदार संघासाठी तळेगाव येथे राष्ट्रवादीचे उमेदवार सुनील शेळके यांच्या प्रचारार्थ सभेचे आयोजन करण्यात आले होते. सभेला उपस्थित जन समुदाय पाहता शरद पवारांनी विरोधक उमेदवार राज्यमंत्री बाळा भेगडे यांच्यावर जोरदार टीका केली. 

शरद पवार म्हणाले, की महाराष्ट्राने मला भरभरुन दिले आहे. मुख्यमंत्रीपद, केंद्रीय मंत्रीपद, 52 वर्ष सलग माझ्यावर प्रेम केलं म्हणत आता मला सत्ता तरुणाच्या हाती द्यायची आहे. म्हणून आता बदल हवा आहे. गेल्या दोन महिन्यात नाशिकमधील कारखान्यात 15 हजार कामगार कामावरून कमी केले. पिंपरी चिंचवड शहरात देखील हीच अवस्था आहे. आणखी कारखाने काढले नोकऱ्या देण्यासाठी मात्र सध्या परिस्थितीत वेगळीच पाहायला मिळत आहे. म्हणून बदल महत्वाचा आहे.

चिमुकलीचे जनतेला आवाहन
मावळ विधानसभेचे राजकारण सध्या जोरदार चर्चेत आहे, प्रचारासाठी वेगवेगळे फंडे आपण बघितले असाल, मात्र एका चिमुरडीचा जीव ओतून मतदानासाठी आवाहन कारण कधी बघितलं का? मावळमधील तळेगाव परिसरात शरद पवारांच्या सभेच्या स्थानी शरद पवारांच्या आगमन पूर्वी एका चिमुकलीने संपूर्ण सभेला भारावून टाकले. सुनील शेळके यांच्या बद्दल आपले विचार मांडणारी ही कुणी उत्तम प्रवक्ता नाही किंवा राजकीय पाठबळ नाही मात्र या चिमुकली स्टेजवर येताच सभा गाजवली हे नक्की.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP chief Sharad Pawar campaign in Talegaon for Maharashtra Vidhan Sabha 2019