Pune : लोकसभा निवडणुकीत भाजपमुळे राष्ट्रवादीचे नुकसान? काय म्हणाले NCP प्रवक्ते उमेश पाटील?

देशात भाजपसोबत (BJP) यापूर्वीही अनेक पक्षांनी आघाड्या केल्या आहेत.
Umesh Patil Pune
Umesh Patil Puneesakal
Summary

''भाजपसोबत नितीशकुमार गेले, तिथे फटका बसला नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत गेली, हे देशातील एकच उदाहरण नाही.''

पुणे : "देशात भाजपसोबत (BJP) यापूर्वीही अनेक पक्षांनी आघाड्या केल्या आहेत. त्यांना कधी त्याचा फटका बसला नाही. एखाद्या निवडणुकीत कमी जागा मिळाल्या म्हणून भाजपमुळे राष्ट्रवादी काँग्रेसला (NCP) फटका बसला असे म्हणता येणार नाही.' असे स्पष्ट मत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य प्रवक्ते उमेश पाटील (Umesh Patil) यांनी बुधवारी व्यक्त केले.

राज्याचे अर्थमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी नुकताच अर्थसंकल्प (Budget) सादर केला. त्यावेळी त्यांनी जाहीर केलेल्या महिला, शेतकरी, तरूण, विद्यार्थी, अल्पसंख्याक अशा विविध घटकांसाठी जाहीर केलेल्या योजनांची माहिती पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर, कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख, वैशाली नागवडे आदी उपस्थित होते.

Umesh Patil Pune
'विशाळगडावर अतिक्रमण असेल तर प्रशासन योग्य कारवाई करेल, पण..'; खासदार शाहू महाराजांनी केलं महत्त्वाचं विधान

पाटील म्हणाले, "भाजपसोबत नितीशकुमार गेले, तिथे फटका बसला नाही. राष्ट्रवादी भाजपसोबत गेली, हे देशातील एकच उदाहरण नाही. ममता बॅनर्जी, जॉर्ज फर्नांडीस, फारूक अब्दुल्ला, जयललिता हेही भाजपसोबत गेले होते. भाजपसोबत गेल्याने एखाद्या निवडणुकीत जय-पराजय झाला म्हणून त्यांच्यामुळे नुकसान झाले, असा तर्क निघू शकत नाही.'

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com