

Alliance Strategy: Both NCP Factions to Join Hands for ZP Elections
sakal
माळेगाव : राज्यात ज्या पद्धतीने महानगरपालीकांच्या निवडणूकांना राष्ट्रवादी काॅग्रेस पार्टीबरोबर आम्ही एकत्र आलो, त्याच पद्धतीने आता जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणूकांमध्येही आम्ही अजितदादांबरोबर एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. महानगरपालिकांच्या निवडणूकांमध्ये भाजपने प्रचंड पैशांचा वापर केला, नको त्या गोष्टी करून निवडणूका जिंकल्या आहेत, असे मत राष्ट्रवादी काॅग्रेस शरद पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.