Vidhan Sabha 2019 : राष्ट्रवादीने पिंपरीत उमेदवार बदलला

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑक्टोबर 2019

पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुलक्षणा धर यांची उमेदवारी रद्द करून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी घोषित केली आहे.

पिंपरी : पिंपरी मतदारसंघात राष्ट्रवादी कॉंग्रेसने उमेदवार बदलला आहे. राष्ट्रवादीने सुलक्षणा धर यांच्याऐवजी माजी आमदार अण्णा बनसोडे यांना उमेदवारी दिली आहे. पिंपरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सुलक्षणा धर यांची उमेदवारी रद्द करून अण्णा बनसोडे यांना उमेदवारी घोषित केली आहे.

गुरुवारी नगरसेविका सुलक्षणा धर यांचे नाव यादीत होते. यावर नाराजी व्यक्त करत माजी आमदार अण्णा बनसोडे यांनी अपक्ष म्हणून रिंगणात उतरत असल्याची घोषणा केली होती.  दरम्यान, शुक्रवारी सकाळी पक्ष नेतृत्वाने धर यांचा पत्ता कापून बनसोडे यांना उमेदवारी  जाहीर केली. त्यामुळे शिवसेनेचे आमदार गौतम चाबूकस्वार यांच्याशी थेट लढत होणार आहे. बनसोडे आज दुपारी अर्ज भरणार आहेत.

दरम्यान, राष्ट्रवादीने घेतलेल्या या निर्णयाने धर यांचे कार्यकर्ते हिरमुसले आहेत. तसेच दुसरे इच्छुक शेखर ओव्हाळ यांनीही  माघार न घेण्याचा पवित्रा घेतला आहे. त्यामुळे या दोघांची समजुत कशी काढायची असा पेच नेतृत्वासमोर उभा राहिला आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP gives candidacy to Anna Bansode instead of Sulakshana Dhar in Pimpari.jpg