esakal | कर्मयोगी कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल नाही : प्रदीप गारटकर
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदीप गारटकर

कर्मयोगी कारखाना निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे पॅनेल नाही : प्रदीप गारटकर

sakal_logo
By
डॉ. संदेश शहा - सकाळ वृत्तसेवा

इंदापूर : कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखाना हा राजकारणाचे माध्यम नसून गोर गरीब शेतकऱ्यांचे प्रपंच चालविण्याचे साधन आहे. त्यामुळे आम्ही राजकारणासाठी राजकारण करणार नाही. मात्र ज्यांनी कारखाना कर्जबाजारी करून ठेवला आहे, त्यांनी सभासद हित केंद्रस्थानी मानून कारखाना नफ्यात आणणे गरजेचे असल्याने कर्मयोगी कारखाना निवडणूकीत पक्षाचे पॅनेल उभे न करण्याचा निर्णय पक्षाने घेतला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हाध्यक्षप्रदीप गारटकर यांनी दिली.

श्री. गारटकर पुढे म्हणाले, कारखान्याचे संस्थापक अध्यक्ष,दिवंगत खासदार शंकरराव पाटील, नंतर त्यांच्या पत्नी कै. लीलावती पाटील यांनी सभासद हितास प्राधान्य देवून कारखाना कर्जमुक्त केला मात्र हा कारखाना हर्षवर्धन पाटील यांच्या ताब्यात आल्यानंतर सभासदांवर अन्याय सुरू झाला. इतर कारखान्याच्या तुलनेत सभासदांना टनामागे ४०० ते ५०० रुपये दर कमी मिळत आहे.

हेही वाचा: ओबीसी आरक्षणाच्या सुधारित अध्यादेशावर राज्यपालांची स्वाक्षरी

कर्मयोगी कारखान्याच्या नावावरमशिनरीखरेदी करून ती खाजगी कारखान्यातवापरली जात आहे. ऊसवाहनांचा करार कर्मयोगीवर मात्र त्याचा वापर खाजगी कारखान्यात केला जात आहे.त्याचे पैसे मात्र कर्मयोगी तून दिले जात आहेत. त्यामुळे कारखाना कर्जबाजारी झाला आहे. ऊस उत्पादकांचे गेले नऊमहिन्या पासून पेमेंट नाही, कामगारांचे दहामहिन्याचेपगार थकीत आहेत. विरोधक ऊस उत्पादक सभासदांच्या अनामत रक्कम भरून घेतल्या आहेत, मात्र त्यांना सभासद करून घेतले जात नाही.

विरोधकांच्या ऊसाचे पाच वर्षा पासून गाळप न करता त्यांचे सभासदत्व रद्द केले जाते तर वारसा हक्काने वारसदारांना सभासद केले जात नाही. राष्ट्रवादीकाँग्रेसच्या बागायतदार पदाधिकाऱ्यांचे सदस्यत्व जाणीवपूर्वक रद्द करून त्यांना उमेदवारीपासूनकायदे शीर रित्या दूर ठेवण्यात आले आहे.त्यामुळे निवडणूक जिंकली तरी कारखान्याचा कारभार नीट चालविता येणार नाही अशी स्थितीआहे .त्यामुळे पक्षाने पॅनेल उभे न करण्याचा निर्णय घेतला असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

loading image
go to top