'चंपा' हे नाव भाजप मंत्र्यांकडूनच ऐकलं : अजित पवार

सागर आव्हाड
Saturday, 19 October 2019

भाजपच्या नेत्यानेच त्यावेळी त्यांना चंपा हा शब्द वापरला होता. मी दादाला भेटुन सांगेन, तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले मंत्री असे म्हणतात. भाजपने आज कितीही आव आणला तरी नरेंद्र मोदींमुळे भाजप आहे.

पुणे : चंपा (चंद्रकांत पाटील) हा शब्द माझ्याकडे कोणी वापरला हे मी निवडणूक झाल्यानंतर सांगेन. मी एका भाजपच्या कॅबिनेट मंत्र्यांकडे गेलो होतो, त्यावेळी त्यांनी चंपा माझे ऐकतील असे वाटत नाही असे बोलल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटले आहे.

भाजपचे मंत्री चंद्रकात पाटील यांच्याबद्दल चंपा असा शब्द वापरला होता. त्यानंतर अजित पवार यांच्यावर टीका होत होती. त्यावर आज (शनिवार) प्रचाराची सांगता होत असताना घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत याविषयी वक्तव्य केले.

अजित पवार म्हणाले, की भाजपच्या नेत्यानेच त्यावेळी त्यांना चंपा हा शब्द वापरला होता. मी दादाला भेटुन सांगेन, तुमच्या मांडीला मांडी लावून बसलेले मंत्री असे म्हणतात. भाजपने आज कितीही आव आणला तरी नरेंद्र मोदींमुळे भाजप आहे. त्यांच्यानंतर नितीन गडकरी दिसले नाहीत. मी मुहूर्त व वेळ बघून राजीनामा दिला नाही, मी नौटंकी करणार नेता नाही. मी वेळ बघून काही करत नाही. निवडणूक डोळ्यासमोर ठेवून राजनामा दिलेला नव्हता. आज शेतकऱ्यांमध्ये अस्वस्थता आहे. सत्ताधारी फक्त कलम 370 चा प्रचार करत आहेत. भाजप सेने मध्ये युती राहिली नाही त्यांचे लोक एकमेकांविरुद्ध उभे आहेत. आघाडीच्या सर्व उमेदवारांसाठी आम्ही प्रयत्न करत आहोत. काही ठिकाणी मनसेच्या उमेदवारालाही पाठिंबा दिला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar clarifies on Chandrakant Patil in Pune