Loksabha 2019 : भाजपने बारामती जिंकली, तर राजकारणातून निवृत्ती : अजित पवार

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 23 एप्रिल 2019

भाजपला बारामती जिंकता आली नाही, तर त्यांनी निवृत्ती घ्यावी. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर एकतर्फी निवडणूक म्हणणारे भाजपवाले काय म्हणू लागले हे सगळ्यांनी पाहिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र काम केले आहे. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांनीही मदत केले. हेच चित्र पुणे शहरात पाहायला मिळाले. मावळ आणि शिरुरमध्येही असेच घडेल.

बारामती : भारतीय जनता पक्षाने (भाजप) बारामतीची जागा जिंकली, तर मी राजकारणातून निवृत्ती घेईन, असे वक्तव्य माजी उपमुख्यमंत्री व राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी केले आहे.

बारामतीजवळील काटेवाडी येथे आज (मंगळवार) अजित पवार यांनी कुटुंबियांसह मतदानाचा हक्क बजाविला. यावेळी मतदानानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. बारामती लोकसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे आणि भाजपच्या कांचन कुल यांच्यामध्ये रंगतदार लढत होत आहे. त्यामुळे या मतदारसंघाकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे.

अजित पवार म्हणाले, की भाजपला बारामती जिंकता आली नाही, तर त्यांनी निवृत्ती घ्यावी. बारामतीत राष्ट्रवादी जिंकणार ही काळ्या दगडावरची रेष आहे. मोदींनी येथील सभा रद्द केली, तसेच त्यांनी उमेदवार द्यायलाही उशीर केला. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या दोन टप्प्यांनंतर एकतर्फी निवडणूक म्हणणारे भाजपवाले काय म्हणू लागले हे सगळ्यांनी पाहिले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीने एकत्र काम केले आहे. कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांनीही मदत केले. हेच चित्र पुणे शहरात पाहायला मिळाले. मावळ आणि शिरुरमध्येही असेच घडेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP leader Ajit Pawar open challenge to BJP in Baramati