Datta Bharane: 'तो कार्यकर्ता नव्हता, तर...'; शिवीगाळाच्या व्हिडिओवर दत्ता भरणे यांनी दिलं स्पष्टीकरण

Dattatray Bharane gave explanation: शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.
Dattatray Bharane
Dattatray BharaneEsakal

पुणे- राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि इंदापुरचे आमदार दत्ता भरणे यांचा शिवीगाळ केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. याप्रकरणी शरद पवार गटाच्या नेत्या सुप्रिया सुळे यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे हा मुद्दा तापत असल्याचं चित्र आहे. याप्रकरणी दत्ता भरणे यांनी प्रतिक्रिया दिली असून आपली बाजू मांडली आहे.

मी माझ्या मराठी भाषेमध्ये बोललो आहे. मी शिवीगाळ केलेली नाही. मतदान असल्यामुळे मी गावामध्ये फिरत होतो. अंथूर्ने येथे मला कार्यकर्त्यांची गर्दी दिसली. कार्यकर्त्यांचे भांडण दिसलं. पैसे वाटप होत असल्याचं मला कळालं. त्यामुळे मी तिथे उतरलो. तो कार्यकर्ता नव्हता. बारामती अॅग्रोमधला तो एक कर्मचारी होता. त्याने गावकऱ्यांविषयी आरेतुरेची भाषा केली. माझ्याविषयी देखील त्याने अपशब्द वापरला, असं भरणे म्हणाले.

मी पण माणूस आहे. त्यामुळे मी जर तिथे नसतो, तर अनर्थ घडला असता. कारण, गावकरी त्याच्या अंगावर जाऊन मारहाण करणार होते. तो पैसे वाटप करत होता आणि कार्यकर्त्यांना धमकावत होता. त्यामुळे मी त्याला माझ्या मराठी भाषेमध्ये झापलं आहे, असंही ते म्हणाले.

Dattatray Bharane
Viral: पवार गटाचं काम करणाऱ्याला दत्ता भरणे यांच्याकडून शिवीगाळ? व्हिडिओ रोहित पवारांकडून शेअर

व्हिडिओमधल्या लोकांचे जबाब घ्या. त्यांना विचारा, पैशाचे आमिष, वाटप कोण करत होतं. नोकऱ्यांचे आमिष कोण दाखवत होतं. निवडणूक आयोगाने या लोकांना विचारावं कोण दबाव टाकत होतं. मी तक्रार करणारा माणूस नाही. पण, कोणी तक्रार केली तर त्याला आम्ही कायदेशीर उत्तर नक्की देऊ, असं भरणे म्हणाले.

आमच्या कार्यकर्त्यांना धमकी देत असेल तर आम्ही शांत बसणार का? तो कार्यकर्ता नाही, बारामती अॅग्रोचा कर्मचारी आहे. त्याचं मतदान तिथे आहे. पण, तो पैसे वाटप करत होता. आज सहा वाजल्यानंतर तो तिथे दिसणार देखील नाही. आम्ही दिवसरात्र काम करतो, सर्वांच्या मदतीसाठी मी धावून जातो. त्यामुळे तरीही कोणी चुकीचं काम करत असेल, तर माझ्या भावना व्यक्त करणारच, असं ते म्हणाले.

Dattatray Bharane
Video: दत्ता भरणे यांच्याकडून गावकऱ्यांना शिवीगाळ? सुप्रिया सुळे यांच्याकडून निवडणूक आयोगाकडे तक्रार

रोहित पवार काय म्हणाले?

दत्ता भरणे यांनी शिवीगाळ केली. असंविधानिक भाषा वापरली. आई-बहिणींवर शिव्या दिल्या. गवळी नावाच्या व्यक्तीला शिवीगाळ झाली. आमचे कार्यकर्ते बुथवर बसले होते. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचा अपमान करण्यात आला. सत्तेत आहात म्हणून मग्रुरी केली तर खपवून घेतली जाणार नाही, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com