
शिरूर : चौफुला येथील कलाकेंद्रावरील कथित गोळीबाराच्या प्रकरणावरून शिरूरचे आमदार ज्ञानेश्वर उर्फ माऊली आबा कटके यांची समाज माध्यमांवर नाहक बदनामी केल्याप्रकरणी तालुक्यातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी तीव्र शब्दांत निषेध नोंदविला. याबाबत बुधवारी रात्री उशिरा शिरूरचे पोलिस निरीक्षक संदेश केंजळे यांना निवेदन देऊन बदनामी करणारांविरोधात कायदेशीर कारवाईची मागणी करण्यात आली.