अभिमान तू...सुप्रिया सुळे अन् अजित पवार यांचे अनोखं रक्षाबंधन; खास व्हिडिओ पाहाच

सुशांत जाधव
Monday, 3 August 2020

सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून रक्षाबंधनाचे लाईव्ह शेअर केले आहे. 

मुंबई : देशभरात आज भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण साजरा करण्यात येत आहे. राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे  आणि उपमुख्यमंत्री अजित पवार या राजकारणातील प्रसिद्ध भावंडांनी दरवर्षीप्रमाणे रक्षाबंधन सण साजरा केल्याचे पाहायला मिळाले. राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि खासदार शरद पवार यांच्या मुंबईतील 'सिल्वर ओक' या निवासस्थानी सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या हातामध्ये राखी बांधली. सुप्रिया सुळे यांनी फेसबुकच्या माध्यमातून रक्षाबंधनाचे लाईव्ह शेअर केले आहे.  यावेळी शरद पवार, प्रतिभा पवार आणि सुळे कुटुंबीय उपस्थित होते. पवार कुटुंबिय रक्षाबंधनसह दिवाळी आणि त्यावेळी येणारा भाऊबीजचा उत्सव हा एकत्रितपणेच साजरा करत असतात. 

रक्षाबंधनाच्या निमित्ताने सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून राज्यातील जनतेला देखील शुभेच्छा  दिल्या आहेत. भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याची आठवण करुन देणारा आजचा सण अर्थात रक्षाबंधन. या सणाच्या सर्वांनाच मनःपूर्वक शुभेच्छा! अशा शब्दांत  सुप्रिया सुळे यांनी महाराष्ट्रातील जनेतला शुभेच्छा देताना एक फोटोही शेअर केला आहे.

अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा देताना लिहिलंय की,  महाराष्ट्राच्या जनतेला 'रक्षाबंधन' सणाच्या हार्दिक शुभेच्छा! भाऊ-बहिणीच्या पवित्र नात्याचा सण साजरा करत असताना समाजातील स्त्री-पुरुष समानतेची भावना  अधिक दृढ होईल, असा मला विश्वास आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ncp mp supriya sule and Maharashtra deputy chief minister ajit pawar rakshabandhan celebration in mumbai