राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक
Published on

राष्ट्रवादी काँग्रेसची मुंबईत बैठक

दुष्काळी स्थितीवर होणार चर्चा

ॲग्रोवन वृत्तसेवा
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या राज्यस्तरीय बैठकीचे २८ सप्टेंबर रोजी मुंबईत आयोजन करण्यात आले असून, राज्यातील दुष्काळी परिस्थितीवर या बैठकीत चर्चा होणार आहे. दरम्यान, २८ सप्टेंबरपासून पक्षाध्यक्ष शरद पवार दुष्काळी भागाच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त प्रसारित झाले; मात्र, याबाबत अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.
पक्षाध्यक्ष पवार यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार आहे. पावसाअभावी राज्यातील शेती क्षेत्रावर मोठे संकट निर्माण झाले आहे. दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. पवार यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र पाठवून तातडीने दुष्काळी उपाययोजना सुरू करण्याची मागणी केली आहे.
२८ सप्टेंबर रोजीच्या राज्यस्तरीय बैठकीत प्रामुख्याने दुष्काळी स्थिती, एमपीएससी पेपरफुटी, एसआयआर आदी विषयांवर चर्चा होणार आहे. पक्षाच्या आमदार, खासदारांसोबत पवार २७ सप्टेंबर रोजी दुपारी तीन वाजता चर्चा करणार आहेत.
राज्यस्तरीय बैठकीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे, कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह पक्षाचे खासदार, आमदार, राज्य पदाधिकारी, निरीक्षक, प्रवक्ते, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विविध आघाड्यांचे प्रमुख तसेच विधानसभा निवडणुकीतील माजी उमेदवार उपस्थित राहणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com