राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यास नारायण पेठेत मारहाण, जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

New NCP Office Pune
राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यास नारायण पेठेत मारहाण, जनसंपर्क कार्यालयाची तोडफोड

पुणे : राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्याला भाजपच्या कार्यकर्त्यांकडून मारहाण

पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या पदाधिकाऱ्यास भाजपच्या माथाडी सेलच्या माजी अध्यक्षासह 15 ते 20 जणांनी मारहाण केली. त्याचबरोबर पदाधिकाऱ्याच्या कार्यालयाची मोठ्या प्रमाणात तोडफोड केली. हि घटना बुधवारी सायंकाळी पावणे सात वाजण्याच्या सुमारास नारायण पेठेत घडली. दरम्यान, या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. या प्रकारामुळे राष्ट्रवादी विरुद्ध भाजप यांच्यातील तणाव आणखीनच पुन्हा एकदा वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहे.

आप्पा जाधव असे मारहाण झालेल्या पदाधिकाऱ्याचे नाव आहे. जाधव हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सरचिटणी म्हणून कार्यरत आहेत. जाधव यांचे भिडे पुलाकडून नारायण पेठेत येणाऱ्या चौकात हॉटेल मुरलीधरजवळ जनसंपर्क कार्यालय आहे. जाधव हे त्यांच्या कार्याकर्त्यांसमवेत बुधवारी सायंकाळी त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये बसले होते. त्यावेळी भाजपच्या माथाडी सेलचा माजी अध्यक्ष संतोष कांबळे हा त्याच्या 15 ते 20 साथीदारांसह जाधव यांच्या जनसंपर्क कार्यालयासमोर आला. त्याने जाधव यांना त्यांच्या कार्यालयातच मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणीमध्ये जाधव यांना जबर दुखापत झाली. त्यानंतरही कांबळे व त्याच्या साथीदारांनी जाधव यांच्या कार्यालयाची तोडफोड करीत मोठ्या प्रमाणात दंगा निर्माण केला. या घटनेनंतर कांबळे व त्यांचे साथीदार दुचाकीवरुन तेथून पळून गेले. दरम्यान, त्यातील एक जणाची दुचाकी व चावी जाधव यांच्या कार्यालयासमोरच पडली.

दरम्यान, पक्षाचे सरचिटणीस जाधव यांना मारहाण होऊन त्यांच्या कार्यालयाची तोडफोड झाल्याची माहिती राष्ट्रवादी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, प्रवक्ते प्रदीप देशमुख यांच्यासह प्रमुख कार्यकर्त्यांना समजली. त्यानंतर शहराध्यक्षांसह कार्यकर्त्यांनी तेथे धाव घेतली. या प्रकाराची गांभीर्याने दखल घेऊन शहराध्यक्ष जगताप, देशमुख यांनी विश्रामबाग पोलिस ठाणे गाठले. त्यानंतर कांबळे व त्याच्या साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी पोलिसांकडे केली.

Web Title: Ncp Office Bearer Beaten In Narayan Peth Demolition Of Public Relations Office Pune

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top