ncp sharad pawar and ncp ajit pawar
sakal
पुणे - राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, या दोन्ही पक्षांमध्ये पिंपरी चिंचवड पाठोपाठ पुणे महापालिका निवडणुकही एकत्र लढविण्यावर अखेर सोमवारी शिक्कामोर्तब झाले. तब्बल दोन दिवस चाललेल्या जागा वाटपाच्या वाटाघाटीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष १२५, तर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने ४० जागा लढविण्याचा फॉर्म्युला दोन्ही पक्षांच्या नेत्यांच्या बैठकीमध्ये मान्य करण्यात आला. दरम्यान, जागा वाटपाचा तिढा सोडविण्यात आलेला असला तरीही उमेदवारांची यादी शेवटच्या क्षणापर्यंत गुलदस्त्यातच ठेवून बंडखोरीवर नियंत्रण आणण्यावर दोन्ही पक्षांनी भर दिला आहे.