ncp party ajit pawar sharad pawar
sakal
महापालिका निवडणुकीच्या प्रचारात आघाडी घेणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष निकालात मात्र पिछाडीवर पडला. महापालिकेच्या २०१७ मध्ये मिळालेल्या जागांपैकी निम्म्या जागा गमावण्याची नामुष्की पक्षावर आली.
भाजपच्या लाटेत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या मातब्बर उमेदवारांना पराभवास सामोरे जावे लागले. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेसला अपेक्षेपेक्षा कमी जागा मिळाल्याची सल मनाला बोचणारी असली तरीही, पक्षाच्या पिछेहाटीवर आता आत्मचिंतन करण्याची वेळ आली आहे.