हिमालयावर टिका केल्याने खुज्या टेकड्यांची उंची वाढत नाही - प्रा. दिगंबर दुर्गाडे

किशोर कुदळे
Thursday, 25 June 2020

महाराष्ट्राहसह देशातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष असलेल्या पवार साहेबांवर शिवराळ भाषेत टिका करणाऱ्या गोपीनाथ पडळकरची लायकी, संस्कृती, संस्कार व बुद्धीचे प्रतिबिंब त्याच्या विचारात दिसुन येत आहे. हिमालाची उंची असलेल्या साहेबांसारख्या माणसावर पडळकर सारख्या खुज्या टेकड्यांनी टिका केल्याने टेकडीची उंची कधीही मोठी होत नाही., असा घणाघाती हल्ला पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी पडळकर यांच्या वक्तव्यावर चढविला.

वाल्हे - महाराष्ट्राहसह देशातील राजकारणाचा केंद्रबिंदू असलेले राष्ट्रवादी कॉग्रेसचे अध्यक्ष असलेल्या पवार साहेबांवर शिवराळ भाषेत टिका करणाऱ्या गोपीनाथ पडळकरची लायकी, संस्कृती, संस्कार व बुद्धीचे प्रतिबिंब त्याच्या विचारात दिसुन येत आहे. हिमालाची उंची असलेल्या साहेबांसारख्या माणसावर पडळकर सारख्या खुज्या टेकड्यांनी टिका केल्याने टेकडीची उंची कधीही मोठी होत नाही., असा घणाघाती हल्ला पुणे जिल्हा बॅकेचे माजी अध्यक्ष प्रा. दिगंबर दुर्गाडे यांनी पडळकर यांच्या वक्तव्यावर चढविला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जेष्ठ नेते शरद पवार यांच्याबद्दल पंढरपुर येथे भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी अपशब्द उच्चारल्याबद्दल आज वाल्हे (ता. पुरंदर) येथील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पडळकर यांच्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करत मास्क, सोशल डिस्टन्सिंग तसेच सॅनिटायझरचा वापर करत पडळकर यांनी केलेल्या बेताल वक्त्याविरूद्ध जोरदार घोषणाबाजी करत निषेध केला.त्यावेळी प्रा. दुगंबर दुर्गाडे बोलत होते. याप्रसंगी सरपंच अमोल खवले, दत्तात्रय पवार, महादेव चव्हाण, प्रा. संतोष नवले, गोरख कदम, अशोक बरकडे, अभिषेक दुर्गाडे, संदेश पवार, संतोष दुर्गाडे, महेंद्र भुजबळ, दादा मदने आदि उपस्थित होते.

काय सांगता! विमानाने पुण्यात येणाऱयांपेक्षा जाणाऱयांची संख्या वाढली, 'अशी' आहेत कारणे 

पुढे बोलताना म्हणाले कि, आपल्या वयापेक्षा दुप्पट ज्यांची राजकिय कारकिर्द आहे. अशा पवार साहेबांबद्दल शिवराळ भाषेत बोलण्यापुर्वी पडळकराने त्यांच्या नेत्यांचा मोदी -शहांचा सल्ला घ्यायला हवा होता. यामधुन त्यांची लायकी सिद्ध केली असुन बिरोबाची खोटी शपथ घेऊन समाज बांधवांना फसविणाऱ्या व सत्तेच्या तुकड्यामागे पळत अनेक पक्षांचे उंबरठे झिजवणाऱ्या या श्वानाचा पुरंदर राष्ट्रवादी कॉग्रेसच्या वतीने जाहीर निषेद करण्यात येत आहे. भविष्यात बारामती लोकसभा मतदार संघात व पुरंदर तालुक्यामध्ये ज्या-ज्या वेळी हा दिसेल त्यावेळी त्याचे तोंड काळे केले जाईल असा सज्जड इशाराही यावेळी प्रा. दुर्गाडे यांनी दिला. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

सरपंच अमोल खवले यांनी प्रास्ताविक केले. दिपक कुमठेकर यांनी सुत्रसंचालन तर महादेव चव्हाण यांनी आभार मानले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: NCP protests against Gopichand Padalkar in Walhe