पुणे - राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष दीपक मानकर यांच्या राजीनाम्यानंतर आता पक्षाचा शहराध्यक्ष कोण होणार? याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, आमदार चेतन तुपे, माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यासह पक्षाचे कार्याध्यक्ष प्रदीप देशमुख यांच्या नावांची पक्षात चर्चा सुरू असल्याची माहिती पुढे आली आहे.