रुपाली ठोंबरेंचं चंद्रकांत पाटलांना अनोखं बर्थडे गिफ्ट, म्हणाल्या...

ncp rupali patil give bjp chandrakant patil birthday gift commented on himalaya visit rak94
ncp rupali patil give bjp chandrakant patil birthday gift commented on himalaya visit rak94

पुणे : सध्या राज्यात राज्यसभेच्या निवडणूकीवरून राजकारण चांगलंच तापलं आहे. यादरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना राष्ट्रवादीकडून आज वाढदिवसानिमीत्त अनोखं गिफ्ट देण्यात आलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली ठोंबरे-पाटील यांनी तेलाची बाटली, साबण, ब्रश आणि गोळा केलेला निधी कुरिअरने पाठवला आहे. तसेच, चंद्रकांत पाटील यांना हिमालयात निघून जा आणि ध्यान करा, असा सल्ला देखील दिला आहे. (ncp rupali patil give bjp chandrakant patil birthday gift commented on himalaya visit)

चंद्रकांत पाटील यांच्या, राज्यात कुठेही निवडणूक लावा. मी जर निवडून आलो नाही, तर हिमालयात जाईन, या विधानाचा पाटील यांनी चांगलाच समाचार घेतला आहे. कोल्हापूर येथील पोट निवडणूक चंद्रकांत पाटील लढले नाहीत. पण तिथे भाजपाच्या उमेदवाराला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे त्यांनी वास्तविक पाहता हिमालयात जायला पाहिजे होते. मात्र ते काही गेले नाहीत, असं रुपाली पाटील म्हणाल्या आहेत.

ncp rupali patil give bjp chandrakant patil birthday gift commented on himalaya visit rak94
"ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरु"; राज्यसभा मतमोजणी लांबल्यानं राऊतांचं ट्विट

तसेच तसेच त्यांनी पुढे सांगितले की, चंद्रकांत पाटील यांनी, चुलीत जा, मसणात जा, असी वक्तव्य केली होती. त्यामुळे त्यांनी राजकीय संस्कृती संपविण्याचे काम केले आहे. त्या पार्श्वभूमीवर आज आम्ही चंद्रकांत पाटलांच्या वाढदिवसी हिमालयात जाण्यासाठी पुणेकरांकडून गोळा केलेला निधी आणि तेलाची बाटली, साबण, ब्रश, टूथपेस्ट पाठवत आहोत, असेही रुपाली पाटील यावेळी म्हणाल्या.

ncp rupali patil give bjp chandrakant patil birthday gift commented on himalaya visit rak94
Rajyasabha Election 2022 : दोन राज्यातील 5 आमदारांवर क्रॉस वोटिंगचा आरोप

वाढदिवसाच्या निमित्ताने आयुष्यात चुकणाऱ्या गोष्टी सुधारल्या पाहिजेत हेच चंद्रकांत पाटलांना सांगतोय, या रोजच्या वापरातल्या गोष्टी आहेत, यात वाईट वाटण्यासारखं काही नाही, आम्ही संस्कृती सोडत नाहीत असेही त्यांनी सांगितले. चंद्रकांत पाटलांनी हिमालयात गेल्यावर डोक्याला तेल लावावे, ध्यान करावे. यामुळे त्यांच्या मनाला आणि तेल लावल्याने डोक्याला शांती मिळेल. तसेच तुमच्या संस्कारामध्ये देखील वाढ होईल, त्यामुळे दिलेला शब्द चंद्रकांत पाटील यांनी पाळला पाहिजे आणि हिमालयात जायला पाहिजे , अशा शब्दांत चंद्रकांत पाटील यांना हिमालात जाण्याचा सल्ला दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com