Conflict Between Joint Alliance Candidates
sakal
पुणे : संयुक्त आघाडी असल्याने राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार असलेल्या ठिकाणी राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडूनही काही जणांना उमेदवारी देण्यात आली होती. दरम्यान, शहरातील दोन प्रभागांमध्ये दोन्ही पक्षांचे उमेदवार समोरासमोर आल्यानंतर त्यांना माघार घेण्यास सांगूनही उमेदवारांनी त्याकडे दुर्लक्ष केले. त्यामुळे राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने आपल्या पाच उमेदवारांवर शिस्तभंगाची कारवाई करत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या घड्याळ चिन्हावरील उमेदवारांना पक्षाने आपला पाठिंबा दर्शविला आहे.