Chaos at NCP Sharad Pawar Office Over Candidature Denial
ESakal
पुणे : राष्ट्रवादी कॉंग्रेस शरद पवार पक्षातील उमेदवारी न मिळालेल्या उमेदवारांनी पक्षाच्या मार्केट यार्ड येथील कार्यालयात गोंधळ घातला. पक्षाच्या नेत्यांची बैठक सुरू असतानाच हा गोंधळ झाल्याने पक्षाची बैठक तत्काळ गुंडाळण्यात आली. राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्ष व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी कॉंग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये जागा वाटपाचे निश्चित झालेल्या सूत्राचे पालन न करता दोन्ही पक्षांनी उमेदवारांना मोठ्या प्रमाणात एबी फॉर्मचे वाटप केले.