पुणे - 'कृषीमंत्र्यांचा रंगला जुगार, राज्यातील शेतकरी बेजार', 'विधानसभेत रंगला रमीचा डाव, कृषिमंत्री चले जाव', 'शेतीमालाला नाही किमान हमी, खेलो जंगली रमी', 'कोकाटेंचा राजीनामा घ्या, अन्यथा जुगाराला परवानगी देऊन कोकाटेंना मुख्यमंत्री करा' अशा जोरदार घोषणा देत राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून राज्याचे कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध नोंदविण्यात आला. जिल्हाधिकारी कार्यालयासमोरच सोरट, जुगार, मटक्याचे साहित्य मांडत अनोख्या आंदोलनाद्वारे कोकाटे यांच्या राजीनाम्याची मागणी केली.