
रामटेकडीतील उद्यानाचा प्रश्न, शाळेचा प्रश्न आणि इतर काही महत्वाचे प्रश्न सोडवायचे असेल, तर महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा प्रमुख पक्ष म्हणून दिसला पाहिजे.
पुणे महानगरपालिकेमध्ये राष्ट्रवादी पक्ष हा प्रमुख पक्ष म्हणून दिसला पहिजे
रामटेकडी - रामटेकडीतील उद्यानाचा प्रश्न, शाळेचा प्रश्न आणि इतर काही महत्वाचे प्रश्न सोडवायचे असेल, तर महानगरपालिकेमध्ये (Municipal) राष्ट्रवादी पक्ष (NCP) हा प्रमुख पक्ष म्हणून दिसला पाहिजे, यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले पाहिजे. म्हणजे राज्यातून दिलीप वळसे पाटील, दत्ता भरणे, आम्ही तुम्हाला मदत करू, आणि येथून महानगरपालिकेतील आपले पदाधिकारी मदत करतील. व प्रभागातील कामे होतील. कोरोनाचे सावट होते, अडचणी अनेक आल्या, निधीची कमतरता होती, पण त्याच्या मधून विकास कामाला खीळ न बसता मार्ग काढण्याचा प्रयत्न महाविकास आघाडीचेच्या वतीने आम्ही सगळ्यांनी केला. समाजातील सर्व घटकातील लोकांना न्याय कसा देता येईल यादृष्ट्ने पंचसूत्रीय अर्थसंकल्प जाहीर केला आहे.
नगरसेवक अशोक कांबळे यांच्या संकल्पनेतून रामटेकडी परिसरात उभारलेल्या महापालिकेच्या विविध विकास कामांचा तसेच पंचशील बुद्ध विहार व डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवनचा लोकार्पण सोहळा पवार यांच्या हस्ते पार पडला. यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा: महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचे सूचक वक्तव्य
रामटेकडी तील विकास कामे मार्गी लावण्या करीता नगरसेवक अशोक कांबळे व ज्या ज्या सहकारी मित्रांनी पाठपुरावा केला प्रयत्न केला, त्या सर्वांचे कौतुक यावेळी पवार यांनी केले.
सदर कार्यक्रमात एका कार्यकर्त्यांनी स्टेज वर बळजबरीने येण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेळीच त्याला रोखले, त्या कार्यकर्त्यांनी स्टेज वर येऊ न दिल्या ची खंत व्यक्त केली, यावेळी “अरे वेड्या पोलीस त्याचं काम करीत असतात, सुरक्षिततेचा प्रश्न असतो, यामध्ये कुणाचाही अपमान करण्याचं कारण नाही, तुमच्या जोरावरच आम्ही इथ पर्यंत पोहचलो आहोत, आम्ही तुम्हाला कदापि विसरू शकणार नाही,” असे पवार म्हणताच सभागृहात लोकांनी टाळ्या वाजवल्या.
यावेळी आमदार चेतन तुपे, शहराध्यक्ष प्रशांत जगताप, नगरसेवक अशोक कांबळे, फारूक इनामदार, डॉ. संदीप जगदाळे, कविता कांबळे, ईशान तुपे, डॉ. जगदाळे, किरण भालेराव, आपा गरड तसेच रामटेकडीतील नागरिक व प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थित हा कार्यक्रम पार पडला.
Web Title: Ncp Should Be Seen Main Party In Pune Municipal Corporation Ajit Pawar Politics
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..