चार वेळा अपमान होऊनही एकनाथ शिंदेनी आपला स्वाभिमान गहाण ठेवलाय - सुप्रिया सुळे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

NCP Supriya Sule criticize CM Eknath shinde Pune News

चार वेळा अपमान होऊनही एकनाथ शिंदेनी आपला स्वाभिमान गहाण ठेवलाय - सुप्रिया सुळे

वारजे : उपमुख्यमंत्र्यांनी 4 वेळा मुख्यमंत्र्यांचा अवमान केला तरीही एकनाथ शिंदे शांत आहे. त्यामुळे त्यांनी आपला स्वाभिमान गहाण ठेवलाय काय? त्यांची परिस्थिती सोन्याच्या पिंजऱ्या सारखी झाली आहे. उपमुख्यमंत्री मोदी समोर अशा चिठ्या देतील का? ते सोडा साधे चंद्रकांत पाटलाना अशी चिट्टी देऊन दाखवा असे आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी वारजे येथे केले. साहित्यिक कट्टा वारजे आयोजित शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कविसंमेलनातील कवितांचा संग्रह शरदाचे चांदणे पुस्तक प्रकाशन सोहळा आणि पुणे महानगरपालिका समाज विकास विभागाच्या वतीने महिला बचत गटातील महिलांसाठी विविध कोर्सेसचे प्रशिक्षण शिबीर आयोजित केलेल्या सहभागी झालेल्या महिलांना प्रमाणपत्र वाटप समारंभ आज पार पडला.

त्यावेळी सुळे बोलत होत्या. यावेळी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर, पुणे शहर अध्यक्ष प्रशांत जगताप, पुणे महापालिका माजी विरोधी पक्षनेत्या दीपाली धुमाळ, माजी नगरसेवक दिलीप बराटे, सचिन दोडके, सायली वांजळे, लक्ष्मी दुधाने, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिता इंगळे, पुणे शिक्षण मंडळाचे माजी अध्यक्ष बाबा धुमाळ, काका चव्हाण, त्रिंबक मोकाशी, सुरेश गुजर, रघुनाथ ठाकर, निवृत्ती येनपुरे, निलम डोळसकर उपस्थित होते. सुळे म्हणाल्या मंत्रिमंडळा साठी त्यांना दिल्लीला जावे लागते. त्यामुळे महाराष्ट्र दिल्ली पुढे झुकत आहे. त्यामुळे महाराष्ट्राची हानी होत आहे. हे सरकार फक्त घेतलेले निर्णय बंद करताना दिसत आहे. बुलेट ट्रेन ही महाराष्ट्राची मागणी नाही. त्यामुळे त्याचा एवढा हट्टाहास का? आम्ही अडीच वर्ष एकत्रित संसार केला. त्यामुळे खाल्ल्या पिटाला जागले पाहिजे. असे मला वाटते. सद्या देशात दडपशाही चालू आहे.

श्रीलंकेचे काय झाले आपण पाहत आहोत. त्यामुळे संविधान महत्वाचे आहे. दिल्लीत महात्मा गांधींच्या पुतळ्याजवळ आंदोलन न करण्याचा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे, याचा मी जाहीर निषेध करण्याचा निर्णय घेतला आहे. दिल्लीत गेल्यावर महात्मा गांधीजींच्या पुतळ्याजवळ आंदोलन करण्याचा निर्धारही सुळे यांनी व्यक्त केला.

रुपाली चाकणकर म्हणाल्या, वारजेत साहित्यिक कलावंतांना चांगले व्यासपीठ निर्माण केले. राष्ट्रवादीत 365 दिवस आम्हाला काम करावे लागते. बचत गटापासून महिला आयोगाच्या अध्यक्ष होता आल्याची आठवण त्यांनी करून दिली. महेश कुलकर्णी व चंद्रकांत पंडीत सूत्रसंचालन केले तर महादेव गायकवाड यांनी आभार मानले.

Web Title: Ncp Supriya Sule Criticize Cm Eknath Shinde Pune News

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..