
पुणे-बंगळुरू महामार्गावर साऊंडप्रुफ भिंत उभारा; सुप्रिया सुळेंचं गडकरींना पत्र
पुणे : पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर होणारी वाहतूक कोंडी आणि त्यामुळे होणार ध्वनी प्रदूषण हा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. या राष्ट्रीय महामार्गावर वाढती वाहनांची गर्दी आणि त्यामुळे होणारे ध्वनी प्रदूषण आणि हवेचे प्रदूषण याचा त्रास पुणेकरांना सहन करावा लागत आहे. यादरम्यान सुप्रिया सुळे यांनी पुणेकरांच्या या प्रश्नाची दखल घेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून मदत करण्याची मागणी केली आहे. (NCP supriya sule writes nitin gadkari for Sound Proof Wall on the highway on Pune Bangalore Highway)
दरम्यान राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणी ट्वीट करत, पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असून त्यामुळे ध्वनिप्रदूषण होते. या समस्येचे निराकरण करण्यासाठी पुण्यातील महामार्गावर वाकड ते नर्हे या मार्गावर साऊंडप्रुफ वॉल/बॅरियर उभारावेत, अशी विनंती गृहनिर्माण संस्था आणि विविध संस्था करत आहेत, असे म्हटले आहे.
सुप्रिया सुळे यांनी या प्रश्नाबाबत केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहिले आहे. त्यांनी या पत्राचा फोटो ट्वीटरवर पोस्ट केला आहे ज्यामध्ये त्यांनी पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर वाढलेली वाहतूक आणि त्यामुळे होणाऱ्या ध्वनिप्रदुषणाच्या समस्येबाबत लक्ष घालावे अशी विनंती केली आहे.
हेही वाचा: हिंमत असेल तर समोरासमोर या..; उदयनराजेंचं अजितदादांना खुलं आव्हान
हेही वाचा: YES Bank Scam : बिल्डर संजय छाब्रिया यांना १४ दिवसांची कोठडी
पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावर चांदणी चौकात होणारी वाहतूक कोंडीच्या प्रश्नाबाबत देखील लक्ष घेण्याची मागणी केली आहे. नितीन गडकरी आणि NHAI प्राधिकरण या प्रकरणाची चौकशी करून मदत करतील अशी विनंती सुप्रिया सुळे यांनी केली आहे. चांदणी चौकात मेट्रो आणि उड्डाण पुलाचे काम सुरु असल्याने सततच्या वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते. याचा सामान्य नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतो. तसेच याच महामार्गावर नवले पुल परिसरात होणारे अपघात हे देखील चिंतेचा विषय बनले आहेत
Web Title: Ncp Supriya Sule Writes Nitin Gadkari For Sound Proof Wall On The Highway On Pune Bangalore Highway
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..